Tuesday, 10 May 2016

तुटलेली नाती

               तुटलेली नाती

चार चौकतीट मन आम्ही रमवीले,
या सुंदर निसर्गाशी नाती  आम्ही तोडीले,


लगोरीच्या चेंडू पेक्षा,
टीव्हीचा रिमोट हातात हवा,
खेळतांना भांडण्याचा,
विसरलोच आम्ही गोडवा;

विसरलोच आम्ही फ़ुलांचा सुगंध ,
परफ्युम आणि ङिओच्या नादात,
तो मनमोहक गंध नाहीतर,
फक्त रसायन आमच्या श्वासात;

लोकांची खरी नावे काय हे,
लक्षातच नाही आमच्या,
कारण फेसबुक आणि व्हाट्सअपॅ वर टोपण नावे ठेवून,
आम्ही स्वता:च घालवली त्यातील मजा;

आता स्वप्नातही,
अप्सरा आणि भूतं येत नसतात ,
कारण आजचं सोडून भविष्यात कसं जगायचं,
हाच एफ विचार सतत आमच्या डोक्यात;

सगळं आता घरपोच असतं,
सगळं त्यांनी निवळलेलं असतं,
पण बाजारात जाऊन स्वतः निवळायाची,
विसरलीच की हातं;

मोठमोठी इमारती आम्ही जरी उभारले,
स्वतःचा सोयी प्रमाणे जग आम्ही बनवीले,
सोयींमध्ये रमतांना मात्र,
या सुंदर निसर्गाशी नाती आम्ही तोडीले;
   
                            -AEM KAY 

6 comments: